२५ महापालिकांमध्ये भाजपा किंवा महायुतीचा महापौर येईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्यातल्या २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपा किंवा महायुतीचा महापौर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मुंबईतही महायुतीचाच महापौर असेल, असा दावा त्यांनी केला. विकासाच्या अजेंड्याला जनतेनं पाठिंबा दिला आहे. तोच अजेंडा पुढे नेऊन शहरांचा विकास करायचा असल्याचं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.