January 16, 2026 7:38 PM

views 57

२५ महापालिकांमध्ये भाजपा किंवा महायुतीचा महापौर येईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्यातल्या २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपा किंवा महायुतीचा महापौर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मुंबईतही महायुतीचाच महापौर असेल, असा दावा त्यांनी केला. विकासाच्या अजेंड्याला जनतेनं पाठिंबा दिला आहे. तोच अजेंडा पुढे नेऊन शहरांचा विकास करायचा असल्याचं ते म्हणाले. 

December 30, 2025 1:57 PM

views 105

Maharashtra: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल   आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.   दरम्यान, विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये पक्षांतर तसंच युती सारख्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत.जाग...

October 16, 2025 7:10 PM

views 92

राज्यातल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर

बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिकांच्या, तसंच या महापालिकाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानुसार बृहन्मुंबई  महानगरपालिकेचे कर्मचारी, तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  ३१ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. तर आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार, आणि बालवाडी शिक्षिका-मदतनीस यांना ५ हजार भाऊबीज दिली जाईल.    नवी मुंबई महानगरपालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपय...

July 11, 2025 8:20 PM

views 65

महानगरपालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तपासणीला सुरूवात

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करावी ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ...