बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिकांच्या, तसंच या महापालिकाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. तर आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार, आणि बालवाडी शिक्षिका-मदतनीस यांना ५ हजार भाऊबीज दिली जाईल.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये, आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. तर ठाणे महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मिळेल.