मुंबईची जिया राय ठरली जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू

मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. जिया हिनं हे ३४ किलोमीटरचं अंतर २८ आणि २९ जुलैदरम्यान १७ तास, २५ मिनिटांमध्ये पार केलं.