संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद उद्या आणि परवा मुंबईत विधान भवनात आयोजित केली आहे.
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत “प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजांचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका” या विषयावर विचारमंथन होईल. परिषदेच्या समारोपानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची वार्ताहर परिषद होईल.
संसदेच्या तसंच सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि राज्यातले संसद सदस्य देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.