मुंबईत मालाड इथल्या महानगरपालिकेच्या ‘मनोहर वामन देसाई’ रुग्णालयात आज ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजने अंतर्गत महिला आणि बालकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात गर्भवती महिलांची आणि लहान मुलांची तपासणी आणि लसीकरण करण्यात आलं. तसंच आहारतज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.
शिबिरात सादर केलेल्या जनजागृतीपर नाटकाच्या माध्यमातून मधुमेह आणि उच्च रक्तदाब प्रतिबंध, क्षयरोग तपासणी, पावसाळ्यातले आजार, जीवनशैली व्यवस्थापन आणि आजाराचं लवकर निदान, याबाबत माहिती देण्यात आली.