डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 9, 2025 8:43 PM | Monsoon | Mumbai

printer

मुंबईकर सावधान ! पावसाळ्यात धोक्याची घंटा

यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्राला मोठी भरती येणार आहे, त्यामुळे मुंबईसाठी यंदाच्या पावसाळ्यातले १८ दिवस धोक्याचे आहेत, असा इशारा महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिला आहे.  या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. या दिवसांत पर्यटकांनी किनाऱ्यावर जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.