पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत, कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा – मुख्यमंत्री

कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांची उपासमार होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.