मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात आज जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं. यावेळी गोयल यांनी नागरिकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिका, गृहनिर्माण संस्था, पोलीस विभागांशी संबंधित आपल्या तक्रारी मांडल्या. तातडीनं या समस्या सोडवाव्यात असे निर्देश गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  यावेळी दिले.