डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 22, 2025 11:46 AM | Mumbai high Court

printer

दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयाची चिंता व्यक्त

देशभरातल्या विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. विमानतळांवर व्हीलचेअरच्या कमतरतेमुळे या व्यक्तींना त्रास होऊ नये यासाठी नागरी विमान वाहातूक संचालनालय, विमानतल संचालक आणि विमान कंपन्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या संदर्भात दाखल दोन याचिकांवर सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले.