February 21, 2025 3:07 PM | Mumbai high Court

printer

मुंबई उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या स्थायी नियुक्तीला न्यायवृदांची मंजुरी

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृदांने मुंबई उच्च न्यायालयामधल्या तीन अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या न्यायवृंदाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

 

शैलेश ब्रह्मे, फिरदौश पुनावाला आणि जितेंद्र शांतिलाल जैन यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला न्यायवृंदाने मान्यता दिली आहे.यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्याची शिफारसही न्यायवृंदाने केली आहे.