डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 28, 2025 9:12 PM | BMC | Mumbai

printer

सावधान ! उघड्यावर कचरा जाळल्यास बसणार दंड

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना यापुढं  १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतका दंड आकारला जाणार असल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषण तसंच पर्यावरण विषयक गंभीर धोके निर्माण होत असल्याची जाणीव करून देण्यासाठी महानगरपालिकेनं दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे.