मुंबईचा AQI अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला आहे. दिवाळीत हा निर्देशांक झपाट्याने खालावला होता. दोन दिवस काही ठिकाणी पडलेल्या तुरळक पावसाने धुरके खाली बसून निर्देशांकात सुधार व्हायला मदत झाली. बहुतांशी ठिकाणी हा निर्देशांक मध्यम श्रेणीत पोचला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे भातशेतीचं नुकसान झालं आहे. अरबी समुद्रात वादळी परिस्थती निर्माण झाल्यामुळे बंदरांमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा प्रशासनं दिला आहे. मालवण जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला होडीसेवा बंद ठेवण्यात आली आहे.