मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी २४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी २०२२ मधे राजीनामा दिला होता. त्यानंतर २३ पैकी १५ संचालकांना अपात्र ठरवल्यामुळे २३ सदस्यांची गणपूर्ती होत नव्हती. त्यामुळे निवडणूक होत नव्हती, मात्र हे आता संचालक पात्र ठरल्यानं निवडणूक होत आहे.
Site Admin | February 20, 2025 7:58 PM | Mumabi APMC
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक
