डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 16, 2025 3:42 PM | MSRTC | school bus

printer

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बस मिळणार

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या दोशने एक्कावन्न आगारांमधून दररोज आठशे ते हजार बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलीत बस उपलब्ध करून दिल्यानं, महामंडळाला मागच्यावर्षी ९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्याअनुषंगानंच यावर्षी देखील या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा – महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचं आयोजन करण्यासाठी आवाहन कर असल्याची माहितीही त्यांनी दिली.