November 16, 2025 3:42 PM

views 152

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बस मिळणार

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या दोशने एक्कावन्न आगारांमधून दररोज आठशे ते हजार बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सहलींसाठी शाळा महाविद्यालया...