ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथं हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकत होता म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चेकरी जमा झाले असून, पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.