डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये-एन बीरेन सिंग

मणिपूरमधल्या संघर्षाला अमली पदार्थ, घुसखोरी, आणि जंगलतोड अशी विविध कारणं असल्याचं मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी म्हटलं आहे. समाजमाध्यमावर लिहीलेल्या पोस्टमधे त्यांनी म्हटलंय की मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये. मणिपूरने आतापर्यंत खूप भोगलंय आणि मणिपूरच्या बाहेरच्या व्यक्तींनी त्यासंदर्भात ढवळाढवळ करु नये. मे २०२३ पासून मणिपूरमधे झालेल्या संघर्षात अडीचशेहून जास्त जणांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर बीरेन सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला.