डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अर्थसंकल्पामध्ये देशातल्या रेल्वेसाठी २५२२०० कोटी रुपयांची तरतूद

देशातल्या रेल्वेच्या विकास आणि कार्यक्षमता वाढीसाठी अर्थसंकल्पामध्ये २ लाख ५२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी नवीन रेल्वे मार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी आणि रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी ३२ हजार कोटींची तरतूद आहे. १६ हजार २४० कोटींची नवीन रेल्वे मार्गिकांची कामं सुरु आहेत. या आर्थिक वर्षात ५० नव्या नमो भारत गाड्या, १०० नव्या अमृत भारत गाड्या आणि २०० नव्या वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आहे.