परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा ९ दिवसाच्या दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर

परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा येत्या शुक्रवारपासून ९ दिवस दक्षिण अमेरिकेतल्या ४ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रथम ते उरुग्वेमधे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यमांडु ओर्सी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. बहामा आणि बार्बाडोसमधे ते उभयपक्षी सहकार्यावर उच्चपदस्थांची भेट घेतील. गेल्या नोव्हेंबरमधे गयानामधे झालेल्या भारत कॅरिकोम शिखर परिषदेत या देशांबरोबर झालेल्या चर्चेतल्या मुद्द्यांवर ते भारताचे प्रतिनिधी म्हणून चर्चा करतील. बार्बाडोसमधे तिथला सर्वोच्च नागरी सन्मान फ्रीडम ऑफ बार्बाडोस ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं स्वीकारतील. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.