डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री मोदी यांनी कल्याणकारी काम केल्यानं तिसऱ्यांदा शपथ घेतली – राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला, युवक आणि गरीबांच्या कल्याणासाठी भरीव काम केल्यानं सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडूतल्या तिरुवन्नलमलाईमध्ये ते बातमीदारांशी बोलत होते.

 

नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता वितरीत केल्यानं शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत  झाल्याचं मुरुगन यांनी सांगितलं. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज राहणार नसल्याचं ही मुरुगन यांनी नमूद केलं.