नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातल्या ११ आणि मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुग्धविकास योजनेच्या क्षेत्रात दुधाचं संकलन करणं, दुभत्या जनावरांची संख्या वाढवणं, या माध्यमातून या भागात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणं, हे यामागचं उद्दिष्ट आहे.
पंकजा मुंडे यांनी यावेळी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर करायच्या उपाययोजना आणि विविध विकास कामांबाबतच्या मागण्यांचं पत्र केंद्रीय मंत्री गडकरी यांना सादर केलं. त्याला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.