राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल-माणिकराव कोकाटे

राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी, यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. काल नाशिक इथं कोकाटे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आता ड्रोनद्वारे शेती तर रोबोटद्वारे औषध फवारणी केली जात आहे. शेतीत एआय तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकर बैठक घेतली जाणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.