December 17, 2025 8:02 PM

views 180

माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?

सदनिका घोटाळा प्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज अटक वॉरंट जारी केलं. कोकाटे रुग्णालयात दाखल असल्यानं अटक पुढे ढकलण्याची विनंती करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला, तसंच काल या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल कोकाटे यांच्यावर ताशेरे ओढले.  नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्...

February 2, 2025 12:15 PM

views 23

राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल-माणिकराव कोकाटे

राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी, यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. काल नाशिक इथं कोकाटे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आता ड्रोनद्वारे शेती तर रोबोटद्वारे औषध फवारणी केली जात आहे. शेतीत एआय तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकर बैठक घेतली जाणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.

January 4, 2025 3:40 PM

views 20

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद नव्या कायद्यात करणार

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी करायच्या कारवाईबाबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना वेगळी वागणूक देत असून याबाबतचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा...

December 30, 2024 7:04 PM

views 19

शेतीशी निगडीत काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा कृषिमंत्र्यांच्या इशारा

शेतीशी निगडीत वस्तू, अवजारं यांचा काळाबाजार करणारे दुकानदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिला. खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत होत्या. त्या अनुषंगाने विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कोकाटे बोलत होते. यावेळी काळाबाजार थांबवण्यासाठी दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेशही कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.