शेतीशी निगडीत काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा कृषिमंत्र्यांच्या इशारा

शेतीशी निगडीत वस्तू, अवजारं यांचा काळाबाजार करणारे दुकानदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिला. खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत होत्या. त्या अनुषंगाने विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कोकाटे बोलत होते. यावेळी काळाबाजार थांबवण्यासाठी दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेशही कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.