डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 24, 2025 3:21 PM | Minister JPNadda

printer

क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं जेपी नड्डा यांचं आवाहन

क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात ते म्हणाले की, सरकाने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी अनेक पावलं उचलली आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, १०० दिवसांचं अभियान आणि निक्षय पोषण योजनेंतर्गत क्षयरोग ग्रस्तांना मिळणारी आर्थिक मदत दरमहा ५०० रुपयांवरून १ हजार रुपये करण्यात आली आहे, असं नड्डा म्हणाले. क्षयरोग ग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे नड्डा यांनी या संदेशाद्वारे आभार मानले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा