केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातल्या प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद साधला

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्हजच्या निमित्तानं देशभरातल्या प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद साधला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत. या नव्या गोष्टींसाठी तयार राहण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगल्या दर्जाच्या कलाकृतीची निर्मिती आता देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून होऊ शकते आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वेव्हज परिषदेसाठी १ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. यात होणाऱ्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.