कमी-मध्यम उत्पन्न गटांमुळे अर्थव्यवस्थेला जलद गती मिळाली – मंत्री अश्विनी वैष्णव

कमी आणि मध्यम उत्पन्न गटांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे अर्थव्यवस्थेला जलद गतीने वाढण्याकरता मदत झाल्याचं रेल्वे आणि माहिती – प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलतांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, तसंच कमी आणि मध्यम उत्पन्न गटांवर लक्ष केंद्रित करणे या सर्वांमुळे सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे. मोठ्या प्रमाणात कर कपातीमुळे मध्यमवर्गाला फायदा झाला आहे. यूपीएच्या काळात गुंतवणुकीची रक्कम फक्त अडीच लाख कोटी रुपये होती ती आता १५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे असं त्यांनी सांगितलं.