डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सहकाराच्या माध्यमातूनच शेतकरी आत्मनिर्भर होईल – मंत्री अमित शाह

सहकाराच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन  शेतकरी आत्मनिर्भर होईल, त्यासाठी शेतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देणं  आवश्यक आहे, असं केंद्रीय गृह  आणि  सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या अजंग इथं झालेल्या सहकार परिषदेत बोलत होते.

 

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात साखर कारखाना उद्योगाच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकार पाठबळ देत आहे, असं त्यांनी सांगितलं. 

 

अमित शहा यांच्या हस्ते मृदा परीक्षण प्रयोगशाळेचं तसंच बेळगाव मधल्या काजू उद्योगाचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री उपस्थित होते. 

 

या कार्यक्रमानंतर अमित शाह यांच्या हस्ते मुंबईत आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कार्यक्रमाचं  उद्घाटन झालं. सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकता गरजेची असल्याचं  मत त्यांनी व्यक्त केलं.  यावेळी अमित शहा यांच्या हस्ते २०२५ या चालू आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातल्या  कार्यक्रमाच्या  दिनदर्शिकेचं आणि राष्ट्रीय शहरी सहकार वित्त आणि विकास महामंडळाच्या मुंबईतल्या कार्यालयाचं उद्घाटन  झालं.