गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण

बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून, नवी दिल्लीत बानसेरा पार्क इथं उभारलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. या निमित्तानं सराई कालेखान चौकाचं नामांतर भगवान बिरसा मुंडा चौक करायचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.