मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला. यात मराठवड्यातील हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. आपल्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं मनोज जरांगे यांनी वार्ताहरांना सांगितलं.
चर्चेसाठी आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली, मात्र चर्चा सर्वांसमोर करण्याची अट त्यांनी ठेवली आहे. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज करण्याच्या न्यायालयाच्या सूचनेचं पालन करू असं जरांगे म्हणाले. हे आंदोलन शांततेत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.