डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 18, 2024 1:00 PM | Manipur Violence | RSS

printer

मणिपूर हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र निषेध

मणिपूरमधे गेले दोन दिवस उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला असून केंद्र आणि राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांभीर्याने तातडीचे उपाय केले पाहीजेत असं सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून राज्यात दोन समुदायांमधे सुरु झालेला संघर्ष अद्याप धुमसतो आहे. महिला आणि मुलांचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे माणुसकीला काळिमा फासणारं भ्याड कृत्य असल्याचं मणिपूर आरएसएसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या दोन दिवसात मणिपूरमधे विशेषतः इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमधे संतप्त जमावाने मंत्री, आमदार आणि इतर राजकीय नेत्यांच्या घरांवर, कार्यालयांवर हल्ले करुन मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. गेल्या शुक्रवार शनिवारी जिरिबम मधे ६ जणांचे मृतदेह मिळाले.