मणिपूरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत चुडाचांदपूर, तेंगनौपाल आणि चंदेल या जिल्ह्यांमध्ये मोठी शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला, तसंच ६ कट्टरपंथीयांना अटक केली. त्यांच्याकडून २ एसएलआर रायफली, १ इन्सास रायफल, १ संशोधित पॉइंट ३०३ रायफल, १ इन्सास एलएमजी मॅगझीन, ३ इन्सास रायफल मॅगझीन्स, ७.६२ एसएलआर रायफलचे चार मॅगझीन, १, ३०३ रायफल मॅगझीन, पॉइंट ३०३ रायफलची २७ काडतुसं, ७ पूर्णांक ६२ शतांश मिलिमीटर एसएलआरची २३ काडतुसं, १४ राउंड एके रायफलची काडतुसं, ३५ राउंड इन्सासची काडतुसं, ३ मोबाईल आणि ३ आधार कार्ड्स इतकी सामग्री पोलिसांनी जप्त केली.
Site Admin | September 19, 2025 1:39 PM | Manipur
मणिपूरमध्ये ६ अतिरेक्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला
