June 11, 2025 3:22 PM | Manipur

printer

मणिपूर राज्यात जमावबंदी शिथिल

मणिपूर राज्यात खोऱ्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये  आज सकाळी ५ पासून संध्याकाळी ५ पर्यंत जमावबंदी शिथिल केली आहे. इंटरनेट वापरावरचे निर्बंध मात्र  कायम आहेत. इंफाळचा पूर्व आणि पश्चिम भाग, थोंबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या भागांमध्ये अशांततेनंतर  जमावबंदी लागू केली होती.

 

राज्यात उद्भवलेल्या हिंसाचाराला कारणीभूत असल्याच्या आरोपावरुन एका नेत्याला केंद्रीय गुप्तचर विभागाने ताब्यात घेतल्यानंतर या पाच जिल्ह्यांमध्ये होऊ लागलेल्या विरोधाच्या पार्शवभूमीवर हा जमावबंदीचा आदेश  लागू केला होता