भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडनं मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात काल मध्यरात्री राबवलेल्या विशेष अभियानात बंडखोर गटाचे १० सदस्य ठार झाले. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लष्कराच्या विशेष पथकानं ही कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला. ठार झालेल्या बंडखोरांची ओळख पटली असून, ते मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कार्यरत बंडखोर गटाशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे. ही कारवाई अजूनही सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
Site Admin | May 15, 2025 1:01 PM | Manipur
मणिपूरमध्ये बंडखोर गटाचे १० सदस्य ठार
