राज्यात बिबट्यांकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. माणसांवर बिबट्याचे हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर सुरु करणे,पोलिस आणि वनविभागाची गस्त तसंच रेस्क्यू टीम आणि वाहनांची संख्या वाढवणे, बिबट्यांना पकडण्यासाठी ड्रोनचा वापर, नरभक्षक बिबट्यांना शोधून त्यांची नसबंदी करणे अशा अनेक उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. बिबट्यांचा समावेश शेड्यूल एक असल्यामुळे नरभक्षक बिबट्यांना पकडण्यावर, त्यांना मारण्यावर मर्यादा येतात म्हणून बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय यावेळी झाल्याचं फडनवीस यांनी सांगितलं.
Site Admin | November 18, 2025 7:38 PM | Chief Minister Devendra Fadnavis | leopard
बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक