डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईला कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुढची हजारो वर्षे कुणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी सभागृहात आरोप करताना नीट पुरावे द्यावेत, सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा, मात्र चर्चेत कोणतेही पुरावे न देता नुसतेच आरोप करण्यात आले, असं ते म्हणाले.

 

विधिमंडळ परिसरात झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे आपल्याला वेदना झाल्या असून, याबाबत चिंतन करायची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं. अशाप्रकारच्या घटनांमधून समाजाला काय संदेश देणार आहोत याचा विचार करायला हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

 

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आपण केला असून याला सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हणणं योग्य नाही, राज्यात हनी ट्रॅपची एकही घटना झालेली नाही, केवळ नाशिकमध्ये, एका महिलेनं एका उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केली होती, ती तिनं मागे घेतली, असं त्यांनी स्पष्ट केलं. जनसुरक्षा कायद्याबद्दलचा गैरसमज सर्वांनी डोक्यातून काढून टाकावा, हा कायदा केवळ माओवादी विचारसरणीच्या संघटना शोधून त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी आहे, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा