राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य – मुख्यमंत्री

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण लाभार्थी मेळावा आज पुण्यामध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते. या घरांसाठी ८० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद केंद्र सरकारने केली असून राज्य सरकारतर्फे प्रत्येक लाभार्थ्याला ५० हजार रुपयांचं अनुदान देणार असल्याचं ते पुढे म्हणाले. यावेळी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या समारंभात महाआवास राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण झालं तसंच काही लाभार्थ्यांना त्यांच्या घरांच्या प्रतीकात्मक चाव्या प्रदान करण्यात आल्या.