राज्यात ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे, तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड, पुणे, लातूर, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या पाऊस ओसरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राजधानी मुंबईत सकाळपासून वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.