राज्यात शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन करणार आहे. अशा प्रकारचं हे देशातलं पहीलंच आयोजन असेल. या ॲग्री हॅकॅथॉनच्या नियोजनाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या हॅकेथॉनच्या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, शाश्वतशेतीसाठी आधुनिक उपाययोजना, कीटकनाशक आणि जैविक खतांचा वैज्ञानिक उपयोग, शेतमालाची विक्रीसाखळी सुधारण्याकरता ई-मार्केटिंग अशा महत्वाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. या निमित्तानं युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असंही अजित पवार यांनी सांगितलं.

 

राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला मदत होईल, तसंच कृषी क्षेत्राशी संबंधीत नवकल्पना आणि संशोधनाला चालना मिळेल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.