डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या अंमलबजावणीतल्या दुर्लक्षामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे-अंबादास दानवे

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात ३ लाख ३१ हजार अर्ज सरकारकडे पडून आहेत, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान केला. राज्यातल्या एकूण २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी सौर पंपासाठीचा त्यांचा हिस्सा सुद्धा भरलेला आहे. याद्वारे, सरकारकडे ९४४ कोटी रुपये इतकी रक्कम जमा असूनही त्यांना सौर पंप मिळायला आणखी बराच अवधी वाट पाहावी लागणार आहे, असंही दानवे यावेळी म्हणाले. 

 

राज्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अपुरा हमीभाव, अपूरी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीतलं दुर्लक्ष यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप दानवे यांनी केला. अनेक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संख्या वाढवण्याची गरज असूनही नवीन समित्यांची स्थापना झालेली नाही, असे सांगत, ‘शेतकरी ओळख क्रमांक’ बंधनकारक करून शेतकऱ्यांना अनेकांना योजनांपासून दूर ठेवले जात आहे, असे दानवे म्हणाले. बोगस बियाणे आणि खते यामध्येही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा आरोप दानवे यांनी सभागृहात केला.

 

या वेळी आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, अमोल मिटकरी आदी आमदारांनी, ठरावावरील चर्चेत सरकारच्या बाजूने मत मांडले. तर आमदार अभिजीत वंजारी, भाई जगताप यांनी ठरावाच्या विरोधात मत मांडले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा