July 16, 2025 7:04 PM

views 63

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना सभागृहाचा निरोप

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार असल्यानं सभागृहानं आज त्यांना निरोप दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दानवे यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेतला. जनतेचे प्रश्न ठळकपणे मांडता यावेत यासाठी अभिनव आंदोलनं करण्यात दानवे यांनी हातोटी असून विरोधी पक्षनेता म्हणून अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. त्यांची राजकारणातली मोठी कारकीर्द अजून बाकी आहे. त्यांनी लवकरच पुन्हा सभागृहात यावं, असं फडनवीस म्हणाले.   उपमुख्यमंत्री अजित पवार यां...

July 4, 2025 6:29 PM

views 37

राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या अंमलबजावणीतल्या दुर्लक्षामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे-अंबादास दानवे

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात ३ लाख ३१ हजार अर्ज सरकारकडे पडून आहेत, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान केला. राज्यातल्या एकूण २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी सौर पंपासाठीचा त्यांचा हिस्सा सुद्धा भरलेला आहे. याद्वारे, सरकारकडे ९४४ कोटी रुपये इतकी रक्कम जमा असूनही त्यांना सौर पंप मिळायला आणखी बराच अवधी वाट पाहावी लागणार आहे, असंही दानवे यावेळी म्हणाले.    राज्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्...

March 11, 2025 2:40 PM

views 74

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांना समाजमाध्यमावरच्या संदेशात अभिवादन केलं आहे. 

December 12, 2024 7:12 PM

views 34

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीत केली पाहणी

परभणीमधल्या संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परभणीत जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, दानवे यांनी नुकसान झालेल्या व्यापारी आस्थापनांची, तसंच इतर ठिकाणांची पाहणी केली.   दरम्यान, काल झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आस्थापना बंद ठेवण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत आज व्यापारी संघाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची ...

September 12, 2024 6:42 PM

views 30

केंद्रात भाजपाची सत्ता असल्यानं निवडणूक आयोग भेदाभेद करत असेल – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

केंद्रात भाजपाची सत्ता असल्यानं निवडणूक आयोग भेदाभेद करत असेल, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज बीडमधे बोलत होते. शिवसेना जात धर्म बघून उमेदवार देणार नाही. शिवसैनिक आणि संघटना म्हणून कार्य आणि वैचारिक निष्ठा लक्षात घेऊन उमेदवारी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

July 29, 2024 7:33 PM

views 26

राज्यसरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जागरूक नाही – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्यातलं सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जागरूक नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. नवी मुंबईत घडलेल्या घटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दानवे यांनी आज नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना वाढल्यानं त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असल्याचं ते म्हणाले. सर्वत्र लाडकी बहिण योजनेचा गवगवा केला जात आहे पण राज्यातल्या बहिणी सुरक्षित नाहीत, असंही ते म्हणाले.