डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे यांना रिंगणात उतरवलं आहे. ठाण्यातून राजन विचारे, दिंडोशीतून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, तर वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असतील. गुहागरमधून भास्कर जाधव, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, कुडाळमधून वैभव नाईक, तर राजापूरमधून राजन साळवी निवडणूक लढवणार आहेत. नेवासामधून शंकरराव गडाख, बार्शीतून दिलीप सोपल, सावंतवाडीतून राजन तेली, राधानगरीतू के. पी. पाटील आणि शाहुवाडीतून सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

 

माहिममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात महेश सावंत उमेदवार आहेत. शिवसेनेकडून तिथून सदा सरवणकर रिंगणात आहेत. 

 

Image 

 

Image 

 

Image