डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सज्ज – रमेश चेन्नीथला

राज्यातल्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सज्ज असून आघाडी २८८ जागांवर लढणार आहे, असं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  राज्याच्या तिजोरीत पैसै नाहीत, निधीची तरतूद नसतानाही दोन महिन्यात युती सरकारने जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.