डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रामदास आठवले यांच्याकडून महायुतीकडे ५-६ जागांची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडे पाच ते सहा जागांची मागणी केल्याचं रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वार्ताहरांना सांगितलं. आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाली. रिपब्लिकन पक्षाला जागा सोडणं आवश्यक असून महायुतीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल, असं फडनवीस म्हणाल्याचं आठवले यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाल्याचं आठवले म्हणाले. 

 

दरम्यान, महायुतीची सत्ता आल्यावर दोन ते तीन महामंडळांचं अध्यक्षपद, एक मंत्रिपद द्यावं अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पक्षाला जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.