महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर चर्चा सुरू

महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर सहमती शिल्लक असून त्यावर उद्या मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसनं आज जाहीर केलं. काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण झाली आहे. उद्याच्या चर्चेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेसकडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.