डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत, उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होणार’

महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नये, असं त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना बजावलं. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सुमारे १३ ठिकाणी सभा होणार आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे ही ठिकाणं निश्चित झाली आहेत. उर्वरित लवकरच होतील, असं त्यांनी सांगितलं. नवाब मलिक यांच्या बाबतचा निर्णय अजित पवार घेतील. आमदार रवी राणा त्यांच्याच युवा स्वाभिमानी पक्षात राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपाच्या संपर्कात आहेत. सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्याशी समन्वय साधून चर्तेतून योग्य निर्णय घेतील, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. 

 

आर्णी विधानसभा मतदासंघातले माजी आमदार राजू तोडसाम, मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातले नेते रवी राठी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी केला.