डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मविआत प्रत्येकी ९० आणि उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्याचं बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार आहेत. उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना दिल्या जातील, अशी माहिती काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज दिली. 

 

राज्यात विधानसभा निवडणूक हरण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची मोडतोड करून या अफवा पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.