डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन

राज्यातलं महायुतीचं सरकार गरजू जनतेला समर्पित आहे, ते पुन्हा सत्तेत आणा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. जनतेला घरं, स्वच्छतागृहं, पिण्याचं पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर, मोफत औषधोपचार अशा विविध व्यवस्था हे सरकार देत आहे, असं ते म्हणाले. 

 

काश्मीरमधे 370 कलम पुन्हा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, पण त्यांना हे कदापी शक्य होणार नाही, अशी टीका शहा यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. हिंदुत्वाला पाखंड म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवा, असं आवाहन त्यांनी केलं. 

 

महायुती सरकार राज्याचा गौरव पुन्हा आणून देईल, असं आश्वासन त्यांनी चंद्रपूरमधल्या सभेत दिलं.