महायुतीचा विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय आहे, असं प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्र विधानसभा आणि विविध राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात काल विजयोत्सव साजरा करण्यात आला; त्यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. महाराष्ट्रात असत्याचा, घराणेशाहीचा, नकारात्मक विचारांचा पराभव झाला आहे; महाराष्ट्रानं विकसित भारताच्या संकल्पाला आणखी बळकट केल्याचं या यशातून सिद्ध होतं, असं मोदी म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.